जावलीची राजधानी मेढा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात साजरा करणेत आला. जवळवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा बैल गाडीतून बाबाराजेची मिरवणूक काढणेत आली. महाराष्ट्र राज्याचा मी मंत्री असलो तरी जावळीकरासाठी कायम बाबाच असणार आहे आजच्या सत्कारामुळे मला राज्यात काम करण्यास उर्जा मिळेल. असे उदगार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.
यावेळी पुर्नवर्सन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, मेढा नगरपंचायत बांधकाम समिती सभापती विकास देशपांडे,युवानेते संतोष वारगडे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, कांतीभाई देशमुख,अनिल शिंदे,दत्तात्रय पवार, शिवाजी देशमुख, मोहसिन शेख, इम्रान आतार, संदीप पवार, रोहित देशमुख, शिवाजी गोरे, संकेत करंजेकर, समीर पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, यावेळी कोणी मागणी करू न करू जावळीतील स्मशान भूमीचे रस्ते काँकीटचे पक्के करण्याचं
नियोजन केलयं संपूर्ण तालुक्यातील प्रश्न मिटविणार आहे. बोंडारवाडी धरण, महू हातगेघर धरण आणि सोळशी धरण झाली पाहिजेत यासाठी मी प्रयत्नशील आहे.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, बाबाराजे गरुडा सारखे तीष्ण व बारीक सारीक नजर आपल्या मतदारसंघात ठेवतात. मुळातच ते कमी बोलून प्रचंड कामे करतात
वसंतराव मानकुमरे म्हणाले, जावळीच्या मातीतून निवडून आलेला आमदार पहिल्यांदाच मंत्री झालेमुळे याचा मोठा आनंद जावळीकरांना झालायं बाबांनी रस्त्यांच जाळं विनलय, आता जावळी दोन्ही मंत्र्यांनी हुमगांव ते वाई असा रस्ता तातडीने करावा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले, जावळीचा कायापालट महाराज साहेबांच्या नेतृत्वाने न भूतो न भविष्य असा झाला आहे यापूढे असाच जलदगतीने होईल . कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला हार, बुके, आणू नये असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले होते