Skip to Content

मेढा शहरातील सर्व विकास कामांना गती देणार सार्वजनिक बांधकाम मंत्री

मेढा शहरातील सर्व कामांना गती देणार कॅबिनेट मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सोमवार दिनांक 03 फेब्रुवारी 2025



मेढा शहरातील सर्व विकास योजना, विकास कामे यांना गती देऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देत बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणी ,रस्ते ,आरोग्य,शिक्षण, दळणवळण आदी जन सुविधांबाबत विकास कामांचा व जनतेच्या समस्यांचा आढावा घेतला.


 सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुका व मेढा नगरपंचायत स्तरीय बैठक घेतली यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजने, मेढा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता अण्णा पवार, बांधकाम समिती सभापती विकास देशपांडे, संतोष वारागडे,शिवाजीराव देशमुख, इम्रान आत्तार,मोहसीन शेख यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते


यावेळी मेढा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता अण्णा पवार, बांधकाम समितीचे सभापती विकास देशपांडे, संतोष वारागडे ,शिवाजीराव देशमुख ,इम्रान आतार ,मोहसीन शेख यांनी मेढा शहरातील विविध विकास कामाबद्दल पाठपुरावा केला.

in News
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.
मा.ना. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.